मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारीपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज दुपारी दोन वाजता समाजाशी चर्चा करून ते उपोषण सोडण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? दुपारी समाजाशी करणार चर्चा
मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यानंतर आता मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भाजप आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत जरांगे यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील गुरुवारी दुपारी मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी दुपारी दोन वाजता ते समाजाशी चर्चा करणार आहे.
दुपारी दोन वाजता समाजाशी करणार चर्चा
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारीपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज दुपारी दोन वाजता समाजाशी चर्चा करून ते उपोषण सोडण्याची शक्यता आहे. आमदार धस आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्यांचे उपोषण सुटण्याची शक्यता आहे.
अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांच्या सोबत सामूहिक आमरण उपोषणात 110 आंदोलक सहभागी झाले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलन, साखळी उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यात येईल, असा शब्द तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. मात्र एक वर्ष उलटूनही आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता राज्यभरात ठिकठिकाणी सकल मराठा समाज आंदोलन करत आहे. धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
