दि 28 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 06 ते रात्री 8 दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या सहित राहुल खिलारे (पोलीस निरीक्षक गुन्हे), स्वप्नील पाटील (सहा पोलीस निरीक्षक), मिथुन परदेशी (सहा पोलीस निरीक्षक), समीर शेंडे (सहा पोलीस निरीक्षक), विश्वास भाबड (सहा पोलीस निरीक्षक), भापकर (स पो उप निरीक्षक), सुनील हनुवते (पो हवा), दीपक फसाळे (पो हवा), (महिला पो अंमलदार) सोनाली गावडे, (पो हवा) धुमाळ, (पो हवा) खताळ यांनी राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, गुजर वस्ती, खोपडे नगर, निंबाळकर वस्ती, भारत नगर पुन्हा खोपडे नगर, सोपान काका नगर चौक, मोरे वस्ती, वरखडे नगर, कात्रज तलाव, कात्रज गाव या भागामध्ये पाई गस्त घालत या भागातील हुल्लडबाज, गुन्हेगार, व घडणारे अनुचित प्रकार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. व असे ग्रस्त कायमस्वरूपी वेळोवेळी परिसरामध्ये घेतले जातील व भागातील शांतता व सुव्यवस्था कायम टिकवण्यासाठी भारती विद्यापीठ
पोलीस स्टेशन संपूर्ण टीम ही सदैव तत्पर राहील अर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनमार्फत परिसरातील नागरिकांना सांगण्यात आले.
