प्रतिनिधी, संतोष जाधव
आंबेगाव बुद्रुक,भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी पुणे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. संदीपभाऊ बेलदरे पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या बांधकाम मजुरांना कामगारांना पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झीने (साहेब), सरचिटणीस भाजपा बाळासाहेब गरुड, यांच्या हस्ते सुरक्षा संच वाटप करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासन यांच्यावतीने कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी दरवर्षी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती इयत्ता पहिली पासून ते शिक्षण संपेपर्यंत दीड लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. अविवाहित कामगाराच्या विवाहासाठी 30 हजार अनुदान, देण्यात येते. कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये अनुदान देण्यात येते. कामगाराच्या नैसर्गिक मृत्यू अथवा अपघाती मृत्यूसाठी सव्वा सहा लाख रुपयापर्यंत अर्थसाह्य देण्यात येते. कामगारांना घर बांधण्याकरिता दीड लाख रुपये अर्थसाह्य देण्यात येते. कामगाराच्या पत्नीच्या प्रसूतीसाठी 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य देण्यात येते. अशा अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ शासनाकडून कामगारांना देण्यात येतो. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर यांच्यावतीने कामगारांना सुरक्षा संच वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सुधीर निवंगुणे, संजय यादव, अतुल दांगट, दादासाहेब कोंढरे, श्रीकांत लिपाने,ऋषिकेश गायकवाड मंगेश जाधव, विद्याताई डावरे,बेनकर ताई, दिनेश चौधरी, गणेश भिंगारे, अवीनाश गायकवाड,यावेळी असंख्य बांधकाम कामगार उपस्थित होते.














