अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उपोषणाचा दणका,
माननीय नायब तहसीलदार स्वतः हजर राहून हातभट्ट्या धंद्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन संघटना तर्फे शिरूर तालुका या ठिकाणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, हातभट्टी दारू, गोवा गुटखा ,मटका ,गांजा ,अशा अवैद्य रीतीने चालू असलेले सर्व धंदे त्वरित बंद करण्यात यावा याबाबत तक्रार अर्ज दिनांक 20 मार्च रोजी राजे उत्पादन शुल्क शिरूर, तहसील कार्यालय शिरूर, पोलीस उपायुक्त शिरूर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आली होती. तरी त्या अर्जाचे आज अखेरपर्यंत कुठल्याही प्रकारचा कारवाई करण्यात आली नाहीं. म्हणून आज दिनांक13 मे रोजी माननीय तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामीण विभाग जिल्हाध्यक्ष श्री योगेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अमरण उपोषण करण्यासाठी निवेदन देण्यात आली होती. त्या अनुषंगाने तहसील कार्यालय या ठिकाणी अमरण उपोषण ला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अर्जाचे धसका घेऊन माननीय तहसीलदार साहेब यांनी त्वरित व तातडीने पोलीस उपायुक्त व राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त रीतीने बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. व तसे उपोषण माघारी घेण्यासाठी विनंती करून ,आश्वासन देण्यात आली. तरी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी तहसीलदार साहेब यांच्याबरोबर चर्चा करून पुढील एक महिन्याच्या आत मध्ये सर्व शिरूर तालुक्यामध्ये अवैध रीतीने सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यावर कायदेशीर कारवाई करून मोका अंतर्गत कारवाई करण्याची आश्वासन मिळाली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे शिरूर तालुका दौंड तालुका व ग्रामीण विभागातले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिन खंडागळे. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल बोराडे. पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री योगेश भोसले, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री संतोष शितोळे, शिरूर तालुका अध्यक्ष श्री संतोष आढागळे, पुणे जिल्हा पत्रकार विभाग अध्यक्ष श्री दीपक पाटील, मीडिया सेल अध्यक्ष श्री अभिजीत चरापे, व इतर महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तसेच पत्रकार विभाग तालुका अध्यक्ष श्री विजय कांबळे व इतर पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Comment

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें