कात्रज पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

कोयता, मिरचीपूड जप्त; दोन अल्पवयीनांचा समावेश

विशेष प्रतिनिधी
पुणे: पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून कोयता, मिरची पूड, दोरी असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सौरभ गोरक्ष चौधरी (वय २३. रा. जय शंकर कॉलनी, अंजनी नगर, कात्रज), ओंकार महादेव देवकते (वय २२, रा. गल्ली क्रमांक ७, संतोष नगर, कात्रज) आणि रघुनाथ प्रकाश मटकट्टे (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी

३ आरोपींसह दोघाजणांना केली

दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिस कर्मचारी हनमंत मासाळ यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलिसांचे तपास पथक बुधवारी (दि. २५) कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी गंधर्व लॉनजवळ टोळके दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. गंधर्व लॉनजवळ पाच जणांना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक रतिकांत कोळी पुढील तपास करत आहेत. अटक

सुधारगृहात रवानगी

दरोडा टाकण्याच्या तयार करणाऱ्या टोळीमध्ये तीन पौढांबरोबर दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. वयाची खातजमा करून त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले.

Leave a Comment

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें