पुणे: दिनांक ११/१०/२०२४ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रामध्ये आंबेगाव पोलीस स्टेशन या नवीन पोलीस स्टेशनची निर्मीती करण्यात आली असुन तेव्हा पासुन नवनिर्वाचीत आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरु झाले होते. आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मीती होतेवेळी पोलीस स्टेशनचे कामकाजा करीता फक्त दोन रूम उपल होत्या व सदरच्या दोन रुममध्येच आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरु होते. पुणे पोलीस
आयुक्तालय अंतर्गत येणा-या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इतारतीचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली बांधकाम पूर्ण करण्यात आले असुन आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इतारतीचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश
कुमार यांच्या हस्ते फित कापुन व कोनशीला अनावरण करुन दिनांक २३/०५/२०२५ रोजी करण्यात आले आहे. सदरवेळी मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-
आयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक श्री. गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस निरक्षक प्रियांका गोरे, भोजलिंग दोडमिशे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वंजारी, स्वाती देवघर, मोहन कळमकर, रतिकांत कोळी, युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नितीराज थोरात, सुरेश शिंदे, आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

