आम्ही कात्रजकर बऱ्याच गोष्टींमध्ये कायम उपेक्षित राहीले आहोत. कारण हा मतदार संघ २ लोकसभा आणि 3 विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. ही ऐतिहासिक भुमी असुनही कायम वंचित राहीली आहे. साध्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नावातही कात्रजचा उल्लेख नाही. तरी आम्ही सदर विनंती अर्ज करत आहोत कि धनकवडी सहकारनगर सोबतच ‘कात्रज – धनकवडी – सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय असा नावात बदल करण्यात यावा. सदर अर्जाचा आपण विचार करून आमची मागणी मान्य करावी अशाप्रकारे सत्या फाउंडेशन आणि कात्रज मधील इतर सहकाऱ्यांनी मागणी केली आहे.
यावेळी उपस्थित तिमय्या जगले (सहाय्यक आयुक्त क्षेत्रिय कार्यालय धनकवडी – सहकारनगर) राजाभाऊ कांबळे, बालाजी पवार, प्रशांत कांबळे, संजय शिंदे.

Post Views: 737