
पुणे जिल्हा प्रतिनिधी ; स्वप्निल मेदनकर
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आंबेगाव बुद्रुक मधील वेताळ नगर मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण साठी प्रमुख उपस्थिती माझी सैनिक श्री.शिवाजी पवार (जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन अधिकारी) मा.अमरसिंह सोनवणे देशमुख व पुणे महानगर पालिका आरोग्य अधिकारी मा.प्रमोद ढसाळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सर्व रहिवासी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे आयोजन रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते दादासाहेब गायकवाड व यांनी केले होते. नागरिकांमध्ये एकी राहण्यासाठी वेताळ नगर मध्ये रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेकडून असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Post Views: 169













